दौंड : (प्रतिनिधी, संघराज गायकवाड)शहरातील एका नामांकित पोकार फॅमिली मार्ट या मॉल मध्ये लिंगाळी वरुण आलेल्या ग्राहकाने विकत घेतलेल्या डेअरी मिल्क कॅडबरी चॉकलेटवर बुरशी लागल्याचे उघडकीस आले आहे. पोकार फॅमिली मार्ट मधुन खरेदी केलेल्या या चॉकलेटचे पाकीट उघडताच त्यावर बुरशी दिसून आली.हे जर चॉकलेट एखाद्या लहान मुलाला दिली असती तर त्याच्या जीवावर बेतले असते यामुळे ग्राहक आणि परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच याची इमेल द्वारा तक्रार देखील नोंदवली गेली आहे 
Your Complaint registration with FSSAI Food Safety Connect is successful. Your generated Complaint Ticket ID is: 2473309696
-FoSCoS
गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये अशा घटना घडल्याने ग्राहकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती आहे. संबंधित कंपनीने याबाबत तपास करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने अशा प्रकारच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन तपास सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे. ग्राहकांना खरेदी करताना उत्पादनाची expiry date व पॅकेजिंग व्यवस्थित तपासूनच वस्तू घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






















