Homeताज्या बातम्याआदर्श शिक्षक पुरस्काराने किरण घोरतळे सन्मानित

आदर्श शिक्षक पुरस्काराने किरण घोरतळे सन्मानित

कोंढवा पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो):

कोंढवा परिसरातील मिलिंद तरुण मंडळ ट्रस्ट, कोंढवा या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” यंदा राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय, गोकुळनगर, पुणे येथे कार्यरत असलेले लोकमतचे पत्रकार किरण घोरतळे यांना प्रदान करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून घोरतळे सरांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मंडळाच्या वतीने हा सन्मान देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम, शालेय साहित्य वितरण, विद्यार्थीभिमुख अध्यापनपद्धती, नवोन्मेषी शैक्षणिक संकल्पना तसेच डिजिटल शिक्षण प्रणालीचा प्रभावी वापर या कार्यामुळे ते आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिकेत जगताप यांनी दिली.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक वीरसेन बापू जगताप, सामाजिक कार्यकर्ते अमित जगताप (मनसे शाखाध्यक्ष), मंडळाचे अध्यक्ष अनिकेत जगताप, तसेच सामाजिक कार्यकर्ते चिंतामण जगताप, अशोक जगताप, भीमराव जगताप, अॅड. योगेश कापरे पाटील, विशाल कामठे, जयसिंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार योगेश टिळेकर म्हणाले, “कात्रज-कोंढवा परिसरात किरण घोरतळे सरांनी गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य सातत्याने केले आहे. विद्यार्थीहितासाठी त्यांनी राबवलेले शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम हे प्रेरणादायी आहेत. त्यांना मिळालेला ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा त्यांच्या समर्पित कार्याचा सन्मान आहे.”

या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक, पालक तसेच सहकारी शिक्षकवर्गाने घोरतळे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था, राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी, सचिव दिलीप शेठ परदेशी, संचालिका प्रतिभा नाईक, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ काळे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण डमाळ तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी घोरतळे सरांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

error: Content is protected !!