Times of Maharashtra Desk, project Sun Catcher: सध्याच्या जगात सर्वजण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी गुगल वापरते. आगदी लहान मुलांपासून ते मोठी माणसे, महिला माहिती मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात. गुगलने या धावपळीच्या जगात बरीच कामे सोपी केली आहेत. आणि आता गुगलने AI क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने “प्रोजेक्ट सन कॅचर” या प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी पणे पूर्ण केली आहे. गुगलच्या वाटचलीतील हा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत सौरउर्जेवर चालणारे AI कम्प्यूटिंग सिस्टिम आणि डेटा सेंटर उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
सुंदर पिचाई यांनी दिली प्रकल्पाची माहिती
सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प गुगलसाठी महत्वाचा आहे. बाकीच्या तंत्रज्ञान प्रकल्पासोबतच हा प्रकल्प सुद्धा सर्वांसाठी मदत करणार असेल. आत्तापर्यन्त सर्व कंपन्या जमिनीवर आणि समुद्राखाली डेटा सेंटर उभारत आल्या आहेत. पण गुगल आता थेट आकाशात भरारी घेत असून आकाशात AI कम्प्यूटिंग सिस्टिम तयार करण्याच्या वाटेवर आहे. यामध्ये सूर्यापासून थेट ऊर्जा घेऊन तिला AI कम्प्यूटिंग सिस्टिमसाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे पारंपरिक इंधनावरचा भार कमी होईल. गुगलने लो अर्थ ऑर्बिटमधील रेडिएशन कंडिशन्स लक्षात घेऊन एक प्रयोग केला. या टेस्टिंगमध्ये कंपनीने ट्रिलियम-जनरेशन टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स (TPUs), म्हणजेच AI साठी खास बनवलेल्या चिप्स वापरल्या आहेत.TPU म्हणजे Tensor Processing Unit, जे गुगलने खास AI कामासाठी विकसित केलेली प्रोसेसर चिप आहे. ही चिप पारंपरिक CPU किंवा GPU पेक्षा जलद आणि ऊर्जा-कार्यक्षम आहे. या TPU चिप्सनी आवकशात रेडिएशनच्या तीव्र परिस्थितीतही कोणतीही हानी न होता उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्याने गुगलचे हार्डवेअर अवकाशातील तीव्र तापमान आणि रेडिएशनलाही तोंड देऊ शकेल असा विश्वास मिळाला आहे. असे सुंदर पिचाई यांनी ट्विट करत सांगितले आहे.

नक्की सूर्याचा वापर कसा करणार?
या प्रकल्पातील महत्वाचा घटक म्हणजे सूर्य. सूर्याच्या ऊर्जेचा वापर करुन अवकाशातील AI कंप्युटिंग नेटवर्कला वीज पुरवली जाईल. ही ऊर्जा सोलर पॅनेल्सच्या माध्यमातून गोळा केली जाईल. त्यानंतर ती थेट लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित मोठ्या AI सिस्टम्सना ट्रान्सफर केली जाईल. यामुळे पृथ्वीवरील डेटा सेंटर्सवर असलेला ताण आणि ऊर्जेवरील प्रदूषणाचा भार दोन्ही कमी होतील.
प्रकल्प नेमका कशासाठी?
सध्या AI जास्त वापरत असलेले तंत्रज्ञान आहे. भविष्यात AI चा वापर वाढू शकतो. या अनुषंगाने पुढील 5 वर्षात AI डेटा सेंटर ची क्षमता वाढवावी लागू शकते. ही डेटा सेंटर पूर्णता विजेवर चालते. यासाथी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. AI चे अनेक टूल्स जसे की चॅट जीपीटी , जेमिनी इत्यादि चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. या टूल्स चा सर्व्हर 60 टक्के वीज वापरते तर कुलिंग सिस्टिम 7 ते 30 टक्के विजेचा वापर करते. यामुळे नैसर्गिक नुकसान होते. या अनुषंगाने गुगलचे आंतराळातील डेटा सेंटर पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल ठरू शकते.
सुंदर पिचाई यांच्या म्हणण्यानुसार जर सर्व काही नियोजन केल्या प्रमाणे झाले तर 2027 पर्यन्त गुगल कंपनी प्लानेट कंपनीच्या मदतीने दोन उपग्रह लॉन्च करणार आहे. तंत्रज्ञातील हा प्रकल्प भविष्यात अनेक दृष्टीने फायदेशीर असणार आहे असे म्हणायला हरकत नाही.






















