Homeमहाराष्ट्रसंतांच्या सानिध्यातच खरे सुख; भडंगवाडीत अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

संतांच्या सानिध्यातच खरे सुख; भडंगवाडीत अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहात बोलताना सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संतांच्या सानिध्यात राहून भगवंताचे नामस्मरण केल्यास जीवनातील खरे सुख प्राप्त होते, असे प्रतिपादन केले.

स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपेने आयोजित या सप्ताहाच्या सातव्या दिवशी कीर्तनरूपी पुष्प गुंफताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी, भजनी मंडळ, गायक-वादक आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रामराव महाराज पुढे म्हणाले की, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष आणि चिंता हे मनाचे सहा प्रमुख शत्रू आहेत. हे विकार माणसाला प्रगती व शांतीपासून दूर नेतात आणि दुःखाचे कारण बनतात. त्यामुळे प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करून मन शुद्ध ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संत तुकोबारायांच्या अभंगावर सुंदर विवेचन करत नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत समाजात सकारात्मक विचार पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

भडंगवाडी लहान गाव असले तरी सर्वांच्या एकोप्यामुळे सप्ताह भव्यदिव्य स्वरूपात पार पडत असल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!