Homeताज्या बातम्याPMC Ward No. 2: फुलेनगर, नागपूर चाळ; भाजपच्या आव्हानात राष्ट्रवादीची सरशी!

PMC Ward No. 2: फुलेनगर, नागपूर चाळ; भाजपच्या आव्हानात राष्ट्रवादीची सरशी!

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २, म्हणजेच फुलेनगर नागपूर चाळ हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तृत आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रभाग आहे. महालक्ष्मी विहार, टिंगरे नगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, शांतीनगर, फुले नगर आणि येरवडा मेंटल हॉस्पिटलचा काही भाग अशा अनेक झोपडपट्टीबहुल व सोसायट्यांच्या मिश्र वस्त्यांचा यात समावेश आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ९२,६४० आहे. या प्रभागमध्ये अनुसूचित जातींमधील मतदारांची संख्या २१,००३ इतकी लक्षणीय आहे. यासोबतच मुस्लिम मतदारांचीही मोठी संख्या असल्यामुळे या प्रभागातील मतदान हे दलित आणि अल्पसंख्याक मतांच्या ध्रुवीकरणावर अवलंबून असतो. एकूण चार उमेदवार निवडून द्यायचे असल्याने सामाजिक समीकरणे जुळवणारा पॅनलच येथे विजयी होऊ शकतो.

भाजपला गतवैभव गमावण्याचा धोका आणि नेतृत्वाचा तिढा

२०१७ च्या निवडणुकीत या प्रभागात भाजपने तीन जागा जिंकून मोठे यश मिळवले होते. तर राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली होती. आगामी निवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान आहे. गत निवडणुकीतील तीनही माजी नगरसेवकांनी आता वेगवेगळ्या वाटा धरल्या आहेत. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्याने व शीतल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आणि फरजाना शेख यांनी पक्षापासून दुरावा ठेवल्याने भाजपला संपूर्णपणे नवीन चेहरे मैदानात उतरवावे लागणार आहेत. भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवलेल्या प्रमुख नेत्यांचे पक्ष सोडणे किंवा विरोधात जाणे हे या प्रभागात भाजपच्या विजयाच्या शक्यतांवर गंभीर परिणाम करणारे ठरू शकते.

राष्ट्रवादीला अनुकूल समीकरणे आणि आरक्षणाचा कळीचा मुद्दा

एकीकडे भाजपची स्थिती कमकुवत झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ स्थितीत दिसत आहे. माजी आमदार सुनील टिंगरे यांचे बंधू सुहास टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष पॅनल उभा करण्याची शक्यता आहे. पक्षांतर करून आलेल्या शीतल सावंत आणि माजी नगरसेविका अलका खाडे यांचा अनुभव राष्ट्रवादीच्या पॅनलला बळ देऊ शकतो. या प्रभागाचा इतिहास आंबेडकरी विचारांच्या आणि मुस्लिम मतदारांना अनुकूल राहिला आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीला येथे पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला मिळालेले मताधिक्य आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले मताधिक्य पाहता मतदारांची निष्ठा अस्थिर असल्याचे दिसते. म्हणूनच प्रवर्गासाठी पडणारे आरक्षण विशेषतः SC महिला आरक्षण हे अनेक इच्छुकांच्या राजकीय भवितव्यावर आणि प्रभागाच्या अंतिम राजकीय समीकरणांवर निर्णायक प्रभाव टाकणारे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.

0
देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप...

error: Content is protected !!