Homeआरोग्यसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिन व २६/११ च्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भव्य...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिन व २६/११ च्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार; १०० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Times of Maharashtra Desk, Pune: भारतीय संविधान दिन आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व निष्पाप नागरिकांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.

आज बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या रिफेक्ट्री वरील सभागृहात पार पडलेल्या या शिबिरास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर आणि शिवत्व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमरजीत सोनवणे उपस्थित होते. तसेच इतर विविध संघटनांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. विद्यापीठातील तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे शिबिराचे वातावरण अत्यंत उत्साहवर्धक होते.

या रक्तदान शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे जमा झालेले रक्त हे समाजातील गरजवंतांसाठी वापरले जाणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता व्हडगर पाटील म्हणाले की, “या शिबिराच्या माध्यमातून १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. येथे संकलित केलेले रक्त समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे.”

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या अनेक सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने आदित्य डुंबरे, अभिषेक पांढरे, भारत सुरडकर, अथर्व इंगळे, ऋषिकेश गोलांडे, धनंजय विसपुते आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दहशतवादाचा निषेध करत असतानाच, रक्ताच्या नात्याने समाज जोडण्याचा हा स्तुत्य उपक्रम विद्यापीठ परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

error: Content is protected !!