Times of Maharashtra Desk: हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असून. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. आणि पहिल्याच दिवशी रेणुका चौधरी वादाच्या नवीन विळख्यात आडकले आहे. त्या त्यांच्या पाळीव कुत्र्यासह त्यांच्या गाडीतून संसदेत पोहोचल्या. त्यांच्या आगमनाच्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने याला संसदेच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटणे बद्दल बोलताना रेणुका चौधरी म्हणाल्या की “काय अडचण आहे? जर एखादा मुका प्राणी आत आला तर त्यात काय मोठी गोष्ट आहे? तो अजून लहान आहे, चावू पण शकणारा नाही.पण संसदेतले इतर लोक मात्र चावू शकतात. त्यांच्या या विधानाने या वादाला नवीन वळण मिळाले आहे.
तसेच दुसरी कडे रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांबद्दल केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या जर सरकारला अधिवेशनाची इतकी काळजी होती, तर एक महिन्याचे अधिवेशन फक्त पंधरा दिवसांचे का करण्यात आले? , त्या म्हणाल्या, “आपण सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करू याची तुम्हाला काळजी का वाटते? कमी मुद्दे होते का? मग अधिवेशन का कमी करण्यात आले?” असे अनेक प्रश्न विचारात त्यांनी टीका केली आहे.
संसद ही राष्ट्रीय धोरणांवर गंभीर चर्चेसाठी एक व्यासपीठ आहे, जिथे अशा कृती “देशद्रोही” – भाजप खासदार जगदंबिका पाल
रेणुका चौधरी यांच्या या टीकेवर भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी देशद्रोही असा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या संसद ही राष्ट्रीय धोरणांवर गंभीर चर्चेसाठी एक व्यासपीठ आहे, तिथे अशा कृती “देशद्रोही” आणि संसदेच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहेत.”तुमच्या कुत्र्यासह संसदेत येणे आणि नंतर अशा टिप्पण्या करणे देशाला लाज आणते. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.” अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आता हा वाद कोणत्या दिशेला जाणार? यात कोणती कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.






















