Homeमहत्त्वाचेSports Minister Manikrao Kokate सदनिका प्रकरणात क्रीडामंत्री कोकाटे यांची शिक्षा कायम; राजकीय...

Sports Minister Manikrao Kokate सदनिका प्रकरणात क्रीडामंत्री कोकाटे यांची शिक्षा कायम; राजकीय अडचणी वाढल्या

Times of Maharashtra Desk: शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी हा निर्णय दिला.मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, सत्र न्यायालयाने अपील फेटाळून लावत मूळ शिक्षा कायम ठेवली आहे.

दरम्यान, प्रथम वर्ग न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. या निकालामुळे त्यांच्या राजकीय अडचणी आणखी वाढल्या आहेत.गेल्या काही महिन्यांपासून माणिकराव कोकाटे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर त्यांच्याकडील कृषिमंत्रीपदाचा पदभार काढून घेण्यात येऊन त्यांना क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ते अडचणीत सापडले आहेत.

काय आहे सदनिका गैरव्यवहार प्रकरण?
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये सुमारे 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका देण्यात आल्या होत्या. माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी या सदनिका मिळवल्या होत्या. मात्र, हे सर्वजण अल्प उत्पन्न गटातील नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याचा आरोप आहे.तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली होती. चौकशीनंतर दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने संबंधितांना शिक्षा सुनावली आहे.या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!