Homeमहाराष्ट्रPRN ब्लॉक व विशेष संधीबाबत NSUI आक्रमक; पुणे विद्यापीठाला मोर्चाचा इशारा...

PRN ब्लॉक व विशेष संधीबाबत NSUI आक्रमक; पुणे विद्यापीठाला मोर्चाचा इशारा…

Times of Maharashtra Desk, Pune: PRN ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाने आक्रमक भूमिका घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला धडक मोर्चाचा इशारा दिला आहे. आज NSUI चे मीडिया चेअरमन महेश कांबळे, The Aalsi Engineer या यू ट्यूब चॅनेलचे रोणक खबे, ओंकार बेनके तसेच NSUI चे विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. या भेटीत NSUI कडून N+2+1+1 नियम तात्काळ लागू करावा, तसेच १ किंवा २ विषय प्रलंबित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी NSUIच्या प्रतिनिधी मंडळाला उत्तर देताना डॉ. प्रभाकर देसाई यांनी, गेल्या १० वर्षांपासून PRN ब्लॉक असलेल्या विद्यार्थ्यांबाबतचा प्रस्ताव ऍकॅडेमिक काउन्सिल समोर मांडण्यात आला आहे. येत्या एका आठवड्यात परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच २०१९ च्या ज्या विद्यार्थ्यांचे PRN अनब्लॉक झाले आहेत आणि जे अद्याप प्रलंबित आहेत, त्या सर्व प्रकरणांवर काम सुरू असून येत्या सोमवारीपर्यंत याबाबत स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले असल्याचं NSUI.

तसेच, विशेष संधी अंतर्गत या विद्यार्थ्यांना १ ते २ वेळा मुदतवाढ देऊन परीक्षा अर्ज भरून घेतले जातील, आणि सर्व PRN ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकत्र घेतल्या जातील अशी माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. याशिवाय, Combine Passing चे Grace लागू असूनही PRN Hold वर असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवार किंवा मंगळवारपासून परीक्षा अर्ज भरण्याची संधी दिली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ प्रशासनाने ही संपूर्ण प्रक्रिया एक आठवड्यात पूर्ण करणार असल्याचे सांगितले असून, सर्व निर्णयप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष संधी अंतर्गत परीक्षा देता येणार आहे. या परीक्षा जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, NSUI या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं व पुढील सोमवारपर्यंत योग्य निर्णय किंवा अधिकृत परिपत्रक जाहीर न झाल्यास, पुढील मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर NSUI कडून धडक मोर्चा काढणार असल्याचं NSUI चे मीडिया चेअरमन महेश कांबळे यांनी टाईम्स ऑफ महाराष्ट्र सोबत बोलताना स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!