Homeताज्या बातम्याPune Municipal Election: पुण्यात भाजप–शिंदे गटाच्या युतीकडे लक्ष; भाजपचा ‘सेफ गेम’ सुरू

Pune Municipal Election: पुण्यात भाजप–शिंदे गटाच्या युतीकडे लक्ष; भाजपचा ‘सेफ गेम’ सुरू

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील युती कधी जाहीर होणार, जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि उमेदवारांची अधिकृत यादी कधी प्रसिद्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र युतीबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच भाजपने आपली तयारी पूर्ण वेगाने सुरू केल्याचे चित्र आहे.

भाजपने मध्यरात्री काही ठराविक उमेदवारांना एबी फॉर्म  वितरित करत प्रचाराला सुरुवात करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुण्यातील १६५ जागांपैकी भाजपने याआधीच सुमारे १०० जागांवर आपली दावा निश्चित केला होता. त्यानुसार संभाव्य उमेदवारांची यादीही तयार करण्यात आली होती. आता त्याच यादीतील ६० ते ८० उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे समजते. एकीकडे भाजप–शिवसेना युतीबाबत संभ्रम असताना आणि जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच भाजपने ‘सेफ गेम’ खेळत आपले पक्के उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामुळे आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

पुणे भाजपचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज आज
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार तसेच निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने आणि भाजप शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित राहणार आहेत. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!