Homeताज्या बातम्याNagpur Municipal Corporation: नागपूर महापालिकेत भाजपची ‘तयार राहा’ रणनीती; उमेदवार जाहीर न...

Nagpur Municipal Corporation: नागपूर महापालिकेत भाजपची ‘तयार राहा’ रणनीती; उमेदवार जाहीर न करता 300 जणांना तयारीचे आदेश

Times of Maharashtra Desk: राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्या मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने अनेक राजकीय पक्षांनी थेट उमेदवारांची यादी जाहीर न करता एबी फॉर्म देणे किंवा अर्ज व कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्याची रणनीती अवलंबल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपकडून इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. 151 जागांसाठी तब्बल 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली. अनेक प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार असल्यामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रभागातही गोंधळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

नागपूर महापालिकेतील 151 जागांपैकी युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी 8 ते 10 जागा सोडून भाजप किमान 140 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला मर्यादित जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

दरम्यान, नागपूरमध्ये महाविकास आघाडी  एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला 129, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना 12 आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला 10 जागा देण्याच्या सूत्रावर स्थानिक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. दुसरीकडे, भाजपकडून युतीसाठी विचारणा न झाल्याने अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी आणि वंचित यांच्यातील बोलणी सध्या सकारात्मक टप्प्यावर असल्याचे समजते.

महापालिका निवडणूक कार्यक्रम..

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत: 2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप: 3 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी: 3 जानेवारी 2026

मतदान: 15 जानेवारी 2026

मतमोजणी: 16 जानेवारी 2026

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!