Homeताज्या बातम्याजे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार - ओवैसी

जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार – ओवैसी

Times of Maharashtra Desk: नाशिक सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असा घणाघाती आरोप करत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालेगाव येथे एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, तेव्हाच मालेगावची खरी प्रगती होईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

ओवैसी म्हणाले, मालेगावमधील कचरा कंत्राट सत्ताधाऱ्यांकडेच असून शहरातील घाण आणि भ्रष्टाचार यांना तेच जबाबदार आहेत. “मालेगाव साफ ठेवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना कचऱ्यासारखे उचलून फेका आणि एमआयएमला साथ द्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मालेगावच्या पॉवरलूम उद्योगावर सध्या मोठे संकट आले असून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांत विरोधकांनी केवळ लूटमार केली, असा आरोप त्यांनी केला.

अजित पवार यांच्यावर टीका करताना ओवैसी म्हणाले, अजित पवार जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होतील? भाजपविरोधात एक वाक्य बोलले की संध्याकाळपर्यंत ते माघार घेतात, असा टोला त्यांनी लगावला. नाव न घेता त्यांनी स्थानिक नेत्यांवरही निशाणा साधत, तुमचा इथला प्यादा चारों खाने चित होईल,असे म्हटले.

मालेगाव महापालिकेच्या मोठ्या बजेटवर प्रश्न उपस्थित करत ओवैसी म्हणाले, हे पैसे नेमके कुठे जातात? सत्ताधारी रक्त पिण्याचे काम करत आहेत. एमआयएमची सत्ता आली तर तीन वर्षांत महापालिकेची स्थिती सुधारू, मालेगावसाठी व्हिजन प्लॅन तयार केला जाईल, असा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधारी मुंबईत एकत्र असतात, पण निवडणुकांच्या वेळी वेगवेगळे होतात, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या एका नेत्याकडून बनावट जन्म दाखल्याच्या मुद्द्यावरून मालेगावची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, “आपला महापौर बसला की सगळ्यांचा हिशेब होईल, असा इशारा ओवैसी यांनी दिला. सरकारमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी असल्याने शिक्षण घ्या आणि एमआयएमला साथ द्या, असे आवाहन करत त्यांनी महिलांवरील अन्याय, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आणि गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या गुंडाराजावरही तीव्र टीका केली. हा गुंडाराज संपवायचा असेल तर एमआयएमला निवडून द्या, असे आवाहन करत त्यांनी आपले भाषण संपवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : देलनवाडी येथे शाळेत जाण्यासाठी तयारी करत असलेल्या १० वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

खाणीत बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

0
मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : नरसाळा येथील पेसा क्षेत्रात बंद पडलेल्या जुन्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

जळगाव जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेची शक्यता; आमदार-खासदार संख्या वाढणार?

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले...

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसईमध्ये शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या...

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत स्पिरीटसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :  मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या हाडाखेड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध स्पिरीटची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त...

error: Content is protected !!