Homeताज्या बातम्यापुणे विमानतळावर महापौरांनाच ‘नो एन्ट्री’ - प्रशासनाचा बोजवारा, जबाबदार कोण? प्रभारी जनसंपर्क...

पुणे विमानतळावर महापौरांनाच ‘नो एन्ट्री’ – प्रशासनाचा बोजवारा, जबाबदार कोण? प्रभारी जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रेंवर कधी कारवाई होणार?

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- शहराच्या प्रथम नागरिकांनाच विमानतळावर ‘नो एन्ट्री’ मिळावी, ही केवळ धक्कादायकच नव्हे तर पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना ठरली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांना विमानतळ प्रवेश पास नसल्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर जाता आलं नाही. परिणामी, शहराच्या सन्मानालाच धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

सामान्यतः कोणताही मंत्री शहरात आल्यावर महापौर स्वतः उपस्थित राहून स्वागत करतात. मात्र, या वेळी केवळ एका ‘पास’च्या निष्काळजीपणामुळे महापौरांना बाहेरच थांबावं लागलं. हा प्रकार केवळ प्रशासनिक चूक नसून महापौर पदाचा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

महापौर कार्यालयाकडून प्रभारी जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांना वेळेत पास काढण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात अपयश आलं. प्रश्न असा की – ही केवळ हलगर्जीपणा की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

दरम्यान, महापौरांनी संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. मात्र, ही कारवाई नेमकी कधी होणार? की हा विषयही फक्त चर्चेतच राहणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

यामागे आणखी एक गंभीर प्रशासकीय गोंधळ समोर आला आहे. नगरसचिव योगिता भोसले यांची बदली झाल्यानंतर राजशिष्टाचार अधिकारी पद रिक्त आहे आणि त्याचा प्रभारी चार्जही कोणाकडे नाही. त्यामुळे विमानतळ पास काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

एकीकडे शहराचा सन्मान, तर दुसरीकडे प्रशासनाचा निष्क्रियपणा — या दोन्हींच्या कचाट्यात पुणेकरांची प्रतिमा चिरडली जात आहे.

👉 महापौरांचा अपमान झाल्यानंतरही जबाबदारांवर कारवाई होणार का?
👉 की पुन्हा एकदा ‘फाईल’मध्येच सगळं दडपलं जाणार?

पुणेकर आता उत्तरांची वाट पाहत आहेत…

भाग 2 मध्ये योगेश हेंद्रेंबाबत मोठी माहिती आणणार समोर…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!