Homeक्राईमनिफाड तालुक्यातील सुकेणे येथील संघर्ष कन्या नीलम निकम (जाधव) यांची प्रथम वर्ग...

निफाड तालुक्यातील सुकेणे येथील संघर्ष कन्या नीलम निकम (जाधव) यांची प्रथम वर्ग न्यायाधीशपदी भरारी…

निफाड (प्रतिनिधी – उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील सुकेणे गावातील नीलम निकम (जाधव) यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश पदावर झेप घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पतीच्या आकस्मिक निधनानंतर खचून न जाता, त्यांच्या अपूर्ण स्वप्नाला स्वतःचे ध्येय मानून त्यांनी संघर्षाच्या जोरावर हे शिखर गाठले.

साध्या कुटुंबात जन्मलेल्या नीलम यांचे बालपण अत्यंत साधेपणात गेले. गावातील शाळेत शिक्षण घेत असताना त्यांनी शांतपणे आपले आयुष्य पुढे नेले. सन २०१२ मध्ये त्यांचा विवाह झाला आणि नव्या आयुष्याची स्वप्ने त्यांनी पाहिली. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच त्यांच्या पतीचे निधन झाले. या दुःखद घटनेने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

या कठीण प्रसंगी हार न मानता त्यांनी दुःखालाच आपली ताकद बनवली. पतीचे न्यायाधीश होण्याचे अपूर्ण स्वप्न त्यांनी स्वतःचे ध्येय मानले. घरातील जबाबदाऱ्या, समाजाची नजर आणि मनातील वेदना यांचा सामना करत त्यांनी पुन्हा शिक्षणाचा मार्ग स्वीकारला.

त्यांनी बी.ए., बी.एड. आणि एल.एल.बी. या पदव्या प्राप्त केल्या. निफाड न्यायालयात वकिली करताना त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले. अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. मुंबई उच्च न्यायालयातील मुलाखतीत आत्मविश्वासाने सामोरे जात त्यांनी न्यायाधीश पदाची गवसणी घातली.

त्यांच्या या यशाबद्दल निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण ठाकरे, उपाध्यक्ष जंगम तसेच निफाड वकील संघाने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

संघर्षाच्या राखेतून उभी राहिलेली ही यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी असून, नीलम निकम या आगामी काळात समाजासाठी न्यायाची नवी दिशा ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण; विचारांची आजही गरज – शिवाजीराजे जाधव

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) :सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण उत्साहात पार पडले. सिंधखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे...

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

error: Content is protected !!