Homeक्राईमवैष्णवी हगवणे प्रकरणी सहा आरोपींवरआरोप निश्चित, २३ फेब्रुवारीपासून खटल्याची सुनावणी.

वैष्णवी हगवणे प्रकरणी सहा आरोपींवरआरोप निश्चित, २३ फेब्रुवारीपासून खटल्याची सुनावणी.

Times Of Maharashtra डेस्क: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील सहाही आरोपींवर सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले असून २३ फेब्रुवारीपासून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण

वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह १६ मे रोजी भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रारंभी आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आत्महत्या की घातपात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि राज्यभरातून संतापाची लाट उसळली.

या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.आरोपींवर हुंडाबळी,आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक व शारीरिक छळ, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे व कुटुंबीयांना धमकावल्याचा अतिरिक्त आरोप आहे.

आणखी एक हुंडाबळी 

१७ मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण करून जुलै महिन्यात आरोपपत्र दाखल केले. आता सत्र न्यायालयात आरोप निश्चित झाल्याने खटल्याची औपचारिक सुनावणी सुरू होणार आहे.
वैष्णवी आणि शशांक यांचा २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर हुंड्यासाठी तिचा सातत्याने छळ होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याआधीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारीपासून सुरू होणारी सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, अशी राज्यातील जनतेची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

error: Content is protected !!