Homeक्राईममुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा मृत्यू,

Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा स्लॅब अचानक तुटून खाली कोसळल्याने रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि कारचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

 घटना सविस्तर

घटना दुपारी सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, मेट्रो मार्गिकेवरील गर्डर व स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरू असताना सिमेंटचा एक मोठा तुकडा खाली पडला आणि तो थेट ऑटो रिक्षावर कोसळला. त्याच वेळी शेजारील कारलाही त्याचा फटका बसला. स्लॅबच्या तडाख्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अपघाताच्या वेळी रिक्षामध्ये चालकासह तीन प्रवासी होते. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तातडीने परिसर ताब्यात घेत वाहतूक वळवली. रस्त्यावर पडलेला मलबा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची चौकशी सुरु 

दरम्यान, बांधकामादरम्यान सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, तसेच घटनास्थळी आवश्यक बॅरिकेट्स व खबरदारीची उपाययोजना होती का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेट्रो प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मेट्रो बांधकामाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!