Homeक्राईमअफवेचा बळी ठरला तरुण; अडावणे शिवार हादरले, ३०-३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

अफवेचा बळी ठरला तरुण; अडावणे शिवार हादरले, ३०-३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : 
जळगाव तालुक्यातील अडावणे शिवारात जमावाकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत एका अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव-कालंदा रोडवरील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास हा तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. परिसरातील काही नागरिकांना तो मुलाला पळवून नेण्याच्या उद्देशाने आला असल्याचा संशय आला. या संशयावरून परिसरात तणाव निर्माण झाला आणि पाहता पाहता मोठा जमाव गोळा झाला.

जमावाने कोणतीही खातरजमा न करता संबंधित तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी व हाताशी मिळेल त्या वस्तूंनी बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी जळगाव तालुका पोलिसांना कळविले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाक-तोंडातून रक्त येत होते तसेच शरीरावर गंभीर जखमा होत्या.
जखमी अवस्थेतील तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र डोक्याला व अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) पहाटे ४:३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. जमावाकडून कायदा हातात घेतल्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिस अधिक तपास करत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!