Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाची गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अशोक मोताळे...

महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाची गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अशोक मोताळे बिनविरोध

विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेवराई तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, गेवराई येथील समाजाचे सक्रिय व धडाडीचे कार्यकर्ते अशोक बाबुराव मोताळे यांची तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिट (धोबी) समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

बीड येथे नुकतीच महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेची ताकद वाढविणे, समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणे तसेच तालुका स्तरावर संघटन बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गेवराई तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अशोक मोताळे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांची अधिकृतपणे तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रधान पवार, माजी जिल्हाध्यक्ष मोहन राऊत, बीड तालुकाध्यक्ष बाबुराव भालेकर, सचिव विक्रम वाघमारे, ज्येष्ठ नेते आसाराम राऊत, सतीश मुळे, प्रदीप वाघमारे, विकास व्यवहारे, अहीलेश वाघमारे, सोपान राऊत, राहुल राऊत, तुषार कासार, लहुराव माकुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना अशोक मोताळे म्हणाले की, परिट (धोबी) सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून युवकांना मार्गदर्शन, शैक्षणिक मदत, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. समाजातील सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात संघटना नेहमीच सोबत राहील.

दरम्यान, अशोक मोताळे यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!