Homeमहाराष्ट्रगोंडवाना विद्यापीठाच्या कला महोत्सवात ने.हि. महाविद्यालयाचा झेंडा; समूहगीत व एकलगीतात प्रथम

गोंडवाना विद्यापीठाच्या कला महोत्सवात ने.हि. महाविद्यालयाचा झेंडा; समूहगीत व एकलगीतात प्रथम

रुपेश देशमुख  ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सव स्पर्धेत ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी उल्लेखनीय कामगिरी करत अव्वल स्थान प्राप्त केले. विविध सांस्कृतिक आणि क्रीडा प्रकारांमध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी उत्कृष्ट सादरीकरण करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली.

समूहगीत स्पर्धेत डॉ. असलम शेख, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. मिलिंद पठाडे आणि प्रा. आकाश मेश्राम यांनी ‘आता उठवू सारे रान’ हे समूहगीत सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच एकलगीत स्पर्धेत डॉ. मिलिंद पठाडे यांनी आपल्या सुरेल गायनाने प्रथम क्रमांक मिळवला.

लघुनाटिका स्पर्धेत डॉ. धनराज खानोरकर यांनी उत्कृष्ट अभिनय सादर करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय रस्सीखेच स्पर्धेत डॉ. असलम शेख, डॉ. मिलिंद पठाडे, प्रा. आकाश मेश्राम, प्रा. धिरज आतला आणि संजू मेश्राम यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. बुद्धिबळ स्पर्धेत प्रा. आकाश मेश्राम यांनी तृतीय तर डॉ. असलम शेख यांनी पाचवा क्रमांक मिळवला.

या यशामुळे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाने गोंडवाना विद्यापीठाच्या कला महोत्सवात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश भैया, सचिव अशोक भैया, सदस्य गौरव भैया, प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!