Homeताज्या बातम्याग्रामीण भागातील यात्रा-जत्रांवर आता गॅस-पेट्रोल टंचाईचे सावट ?

ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांवर आता गॅस-पेट्रोल टंचाईचे सावट ?

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : वितरण व्यवस्थेवर ताण : काही ठिकाणच्या पंपांवर लावले ‘नो स्टॉक’चे फलक

मार्च-एप्रिल महिना म्हटला की,

ग्रामीण भागात यात्रांचा उत्साह वाढतो. गुढीपाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंत चालणाऱ्या या देव-देवतांच्या यात्रा गावोगावी भरतात. परगावी गेलेले लोक गावाकडे परततात; पाहुण्यांची रेलचेल वाढते आणि गोडधोड, तसेच मांसाहारी जेवणाचे बेत आखले जातात. ग्रामीण जीवनातील हा आनंदाचा हंगाम मानला जातो. मात्र, यावर्षी यात्रांच्या या हंगामावर गॅस आणि पेट्रोलटंचाईचे सावट दिसू लागले आहे.

सध्या देशातील अनेक भागांत एलपीजी गॅस आणि पेट्रोलबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या, तर काही ठिकाणी ‘नो स्टॉक’ फलक लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारकडून पुरेसा साठा

असल्याचे सांगितले जात असले, तरी अफवा, घबराट आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण यात्रांवर होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये…

या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकारने ग्रामीण भागातील गॅस व पेट्रोल पुरवठ्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यात्रांचा हंगाम लक्षात घेऊन ग्रामीण भागात अतिरिक्त सिलिंडर पुरवठा, पेट्रोल पंपांवर नियोजन, काळाबाजार रोखणे आणि अफवांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांनीही घबराट न करता आवश्यक तेवढाच साठा ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.

पेट्रोल टंचाईचा परिणामही ग्रामीण यात्रांवर गंभीर ठरू शकतो. यात्रांच्या काळात एसटी, खासगी वाहन, दुचाकी, ट्रॅक्टर, मालवाहतूक यांचीही वर्दळ असते. पेट्रोल-डिझेल सहज उपलब्ध नसेल तर प्रवास खर्च वाढेल, वाहतूक कमी होईल आणि यात्रेतील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पैलवानांच्या या यात्रांच्या हंगामामध्ये कुस्ती क्षेत्रावर याचा परिणाम होऊ शकतो.

गणेश थोटे कुस्ती संघटक गेवराई

यात्रांच्या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक, गावकरी एकत्र येतात. सामाजिक संबंध दृढ होतात आणि गावात एकोपा वाढतो; पण जर इंधन टंचाईमुळे लोक गावाकडे येऊ शकले नाहीत किंवा कार्यक्रम मर्यादित ठेवावे लागले तर या सामाजिक नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.

श्रीकिसन देवगुडे गावकरी ज्योतिबा उत्सव समिती निपाणी जवळका ता गेवराई जि बीड 

यात्रांच्या काळात गावात मोठ्या प्रमाणावर पाहुणे येतात जेवणावळी होतात हॉटेल आणि खानावळी सुरु होतात तसेच वाहतूक वाढते अशा वेळी गॅस आणि पेट्रोलचे टंचाई निर्माण झाली तर यात्रांचा पारंपरिक उत्साह कमी होऊ शकतो प्रशासनाने पुरेसा साठा उपलब्ध आहे असे जरी सांगितले असले तरी गॅसच्या बाबतीत मागणी तसा पुरवठा सध्या तरी नसल्याने सामान्य नागरिक हातबल आहे असे

रामप्रसाद चाळक सरपंच किनगाव ग्रामपंचायत कार्यालय यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!