Homeमहाराष्ट्रबोराडीतील फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कराटे व आत्मसंरक्षण शिबिर

बोराडीतील फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कराटे व आत्मसंरक्षण शिबिर

बोराडी (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडी येथे डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कराटे व आत्मसंरक्षण शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्याचे कौशल्य विकसित करणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.

या शिबिरासाठी एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. लिंबाजी के. परताळे तसेच स्व. अण्णासाहेब पी. एस. वाडीले आर्ट्स महाविद्यालय, थाळनेर येथील डॉ. तेजस आर. शर्मा यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कराटेच्या मूलभूत तंत्रांची माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह आत्मसंरक्षणाचे विविध उपाय समजावून सांगितले. विशेषतः मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास योग्य पद्धतीने प्रतिकार करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील व उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून शारीरिक व मानसिक सक्षमता वाढविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. हर्षदा वाघ व प्रा. सुनैना मनूरे यांनी केले.

या उपक्रमाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे तसेच नगरसेवक रोहित रंधे यांनी महाविद्यालयाचे व आयोजकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनीही या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अशा उपक्रमांची पुढेही अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

भारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): भारतीय जनता पक्षातर्फे सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेठ बी. एन. सारडा विद्यालयाच्या परिसरात आयोजित...

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!