गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. नुकतेच जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तलवाडा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. अशातच समाजसेवक अरुण काका चाळक यांनी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा आणि विजयी होण्याचा ठाम निर्धार व्यक्त करून राजकीय समीकरणांना वेग दिला आहे.
प्रतिनिधींशी बोलताना अरुण काका चाळक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणारच. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.”
जनतेचा व कार्यकर्त्यांचा पाठिंबा
किनगावचे रहिवासी असलेले अरुण काका चाळक हे गेवराई तालुक्यात एक लोकप्रिय आणि विश्वासू समाजसेवक म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी पुढे असणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत मोठा उत्साह असून, “तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही घरची भाकरी खाऊन तुमचा प्रचार करू” अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत.
मजबूत राजकीय पाठबळ
अरुण काका चाळक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार अमरसिंह उर्फ भैय्यासाहेब पंडित तसेच आमदार विजयसिंह पंडित यांचे विश्वासू व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना मजबूत राजकीय पाठबळही लाभले आहे.
अनुभव विजयाची खात्री
तलवाडा गटातील सर्व समाजघटकांशी घट्ट नातं, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आणि दीर्घकाळाचा जनसंपर्क यामुळे अरुण काका चाळक यांची उमेदवारी अधिक भक्कम मानली जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा सुरूत
तलवाडा गट सर्वसाधारण झाल्याने अनेक दिग्गज नेते या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, अरुण काका चाळक यांच्या नावाची चर्चा सध्या आघाडीवर असून, त्यांच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत वाढणार हे निश्चित मानले जात आहे.
जनतेचा वाढता पाठिंबा, मजबूत संघटनशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अरुण काका चाळक हे या निवडणुकीत एक दमदार चेहरा म्हणून उदयास येत आहेत. आता येणाऱ्या काळात ते आपला शब्द खरा करून विजय मिळवतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






















