Homeमहत्त्वाचेगेवराईत १७.४२ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

गेवराईत १७.४२ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

गेवराई तालुका प्रतिनिधी:(विष्णू गायकवाड)
गेवराईत १७ कोटी ४२ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भव्य शुभारंभ
गेवराई, दि.३१ (प्रतिनिधी) ः- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कटिबध्द असून प्रत्येक शब्द विकास कामांच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. कोल्हेर, मिरगाव आणि सुतगिरणी चौक येथील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते गेवराई विधानसभा मतदार संघात १७ कोटी ४२ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना मंजुरीसह निधी मिळविण्यात आ. विजयसिंह पंडित यांना मोठे यश आले आहे. तत्कालीन पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या निधीमधील कामांचा यामध्ये मोठा समावेश आहे. मंगळवार, दि.३१ मार्च रोजी आ. विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते गेवराई विधानसभा मतदार संघात १७ कोटी ४२ लक्ष रुपये किंमतींच्या विकास कामांचा शुभारंभ होत आहे. आज सकाळी कोल्हेर फाटा येथे १०० लक्ष रुपये किंमतीच्या सिमेंट रस्ता, मिरगाव ते पांढरी या ३२० लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या व माऊली सुतगिरणी चौक ते ताकडगाव या २८२ लक्ष रुपये किंमतीच्या नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संबंधित ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, शहराध्यक्ष दिपक आतकरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास न वले, माजी जि.प.सदस्य जालिंदर पिसाळ, माजी उपसभापती आसाराम मराठे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, तांडा समृध्दी योजनेचे विभागीय सदस्य सुंदरसिंग राठोड, दैठणचे सरपंच प्रतापसिंह पंडित, कोल्हेरचे सरपंच राधेशाम चक्कर, उपसरपंच रवि येवले, चेअरमन कैलास यादव, लुखामसला गावचे सरपंच रावसाहेब काळे, नगर परिषदेचे गटनेते खाजाभाई, माजी उपसभापती सचिन मोटे, अरुण चाळक, श्रीराम आरगडे, शामराव मुळे, दादासाहेब घोडके, समाधान मस्के, गणपत नाटकर, अकरम सौदागर, सरपंच किरण वावरे, सरपंच शिवाजीराव गोडबोले, जगदीश धुमक, भिमराव झाकणे, बाबासाहेब जायगुडे, प्रकाश पऱ्हाड, विशाल उमप, परमेश्वर पवार, बाळू निकम, विजय आखरे, विनोद सौंदरमल, विजय सुतार, गणेश सावंत यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिन विकासासाठी शिवछत्र परिवार कटिबध्द आहे. निवडणुक प्रचाराच्या काळात दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता आगामी काळात होईल, मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला कौल माझ्यासाठी ऊर्जादायक असून जनतेचे आशिर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देणारे ठरतात. येणाऱ्या काळात दर्जेदार कामे करण्यासाठी सर्वांनी सजग रहावे, गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दिलेल्या शब्दाला जागणे हा शिवछत्र परिवाराचा स्वभाव आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील जनता सतत विकास कामांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहत आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी जो उभा राहतो त्याच्या पाठिशी लोक उभे राहतात, त्यामुळे आ. विजयसिंह पंडित या काम करणाऱ्या आमदाराच्या पाठिशी लोक उभे राहतील असा विश्वास सरपंच गणेश सावंत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

कार्यक्रमाला अयज येवले, नितीन मेटे, प्रकाश यादव, शरद चक्कर, रंगनाथ भुसे, सोमनाथ जावळे, विकम नवले, शुभम येवले, , सुनिल काळे, शिवाजी चक्कर, विजय जोंधळे, विजय डोळस, सय्यद नवाज, नारायण मोटे, वैजिनाथ मोटे, मोहम्मद ताहेरसेठ, अंताराम मोटे, राजेश माने, ब्रम्हा गिरी, अंजनराव चाळक, कल्याण पवार, महारुद्र चाळक, तात्यासाहेब चाळक, प्रल्हाद मोटे, दगडूजिजा चाळक, बदाम मोटे, श्रीमंत यादव, मुन्सी पटेल यांसह कोल्हेर, किनगाव, ताकडगाव, मिरगाव, पांढरी आदी भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!