Homeआरोग्यअल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : शिरपूर (धुळे) तालुक्यातील वासर्डी गावात अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बालविवाहाचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या प्रकरणी पीडित मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आई-वडिलांसह पती व सासू-सासऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल शीतल बापू खैरनार यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास वासर्डी गावात अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचा अधिक तपास केला असता बालविवाहाचा प्रकार समोर आला. कन्हेरीपाडा येथील दाम्पत्याने ८ मार्च २०२५ रोजी त्यांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न वासर्डी येथील एका तरुणासोबत लावून दिल्याचे निष्पन्न झाले.

मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असूनही तिच्या पतीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतर १४ मार्च रोजी तिने बाळाला जन्म दिला आणि हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

या प्रकरणी विनोद दशरथ भिल, रत्नाबाई विनोद भिल (रा. कन्हेरीपाडा) तसेच भुरीबाई सुरेश भिल, सुरेश गुलाब भिल आणि राधेशाम सुरेश भिल (रा. वासर्डी) यांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे बालविवाहाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!