Homeपर्यावरणनिफाड माणुसकीला काळी मा फासणारे कृत्य 800 ते 900 द्राक्ष वेली ची...

निफाड माणुसकीला काळी मा फासणारे कृत्य 800 ते 900 द्राक्ष वेली ची कत्तल शेतकऱ्याच्या जीवावर उठले अज्ञात नरधाम!

निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारात एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञातांकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकर साहेबराव कुशारे या शेतकऱ्यांची द्राक्षबाग रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केली. या घटनेत केवळ पीक कापूनच न थांबता आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत सुमारे 800 ते 900 द्राक्षाच्या झाडांची धारदार शस्त्राने कत्तल केली.

याशिवाय शेतातील दोन बोरवेलच्या वायर आणि पाईप कापून टाकण्यात आले. बोरवेलची मोटर चोरीला गेली असून पिण्याच्या पाण्याची टाकीही फोडण्यात आली. त्यामुळे पाण्याची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वर्षभर मेहनत घेऊन जोपासलेली बाग काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने शंकर कुशारे आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा मानसिक व आर्थिक धक्का बसला आहे.

“आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हे पीक उभे केले, आमच्या पोटावर पाय देणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भावना कुशारे कुटुंबीयांनी व्यक्त केली. या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, घटना घडून काही काळ लोटूनही अद्याप कोणालाही अटक न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!