Homeमहाराष्ट्रजळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासनिक फेरबदल करण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्णवाल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातून उशिरा रात्री या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त झालेल्या सीईओ करिश्मा नायर यांच्यासमोर असणार आहे. मीनल कर्णवाल यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वेग कायम ठेवत त्यात अधिक गती देण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा तरुण, तडफदार आणि उच्चशिक्षित अधिकारी लाभल्याने समाधान व्यक्त होत आहे.

करिश्मा नायर यांचा परिचय
करिश्मा नायर या २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस्सी. पदवी संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच २ एप्रिल २०२५ पासून त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

मीनल कर्णवाल यांची कारकीर्द उल्लेखनीय
गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात मीनल कर्णवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेमार्फत अनेक लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवले. विशेषतः ग्रामीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेले निर्णय आणि प्रशासनिक शिस्त यामुळे त्यांची कारकीर्द जिल्ह्यात गाजली. त्यांच्या बदलीनंतर प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नवीन सीईओ करिश्मा नायर यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!