Homeताज्या बातम्याकधी ऊन-वारा, तर कधी अवकाळीच्या धाराच्या आ; बदलत्या हवामानाचा शेती अन् नागरिकांरोग्याला...

कधी ऊन-वारा, तर कधी अवकाळीच्या धाराच्या आ; बदलत्या हवामानाचा शेती अन् नागरिकांरोग्याला धोका

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) :  हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, “दिवसा ऊन-वारा, कधी पावसाच्या धारा आणि रात्री थंडगार वारा” असे चित्र निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेती पिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दिवसभर कडक ऊन आणि वाऱ्याचा जोर जाणवत असताना, दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडगार वारा वाहत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके काढणीच्या टप्प्यावर असून, अचानक पडणाऱ्या पावसामुळे पिके ओलसर होऊन दाण्यांची गुणवत्ता घसरत आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे.

अवेळी पावसाचा फटका टरबूज, खरबूज आदी हंगामी पिकांसह आंबा, मोसंबी फळबागांनाही बसत आहे. फुलोरा आणि लहान फळे गळण्याचे प्रमाण वाढले असून, तापमानातील अचानक बदलामुळे रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. मानवी आरोग्यावरही या हवामानाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार वाढत आहेत.

डॉ. चंद्रशेखर गवळी गढी गेवराई
हवामानातील हे अनियमित बदल वातावरणीय असंतुलनाचे संकेत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आजारी रुग्णांनी स्वतःहून औषधी न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण; विचारांची आजही गरज – शिवाजीराजे जाधव

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) :सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण उत्साहात पार पडले. सिंधखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे...

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

error: Content is protected !!