Homeआरोग्यसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्सची आयशरला जोरदार धडक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्सची आयशरला जोरदार धडक

बदनापूर (प्रतिनिधी सय्यद नजाकत) :  समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असताना आज बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात घडला. एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात २ प्रवासी गंभीर जखमी झाले असून ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३७७.४ जवळ ‘हर्ष ट्रॅव्हल्स’ (क्र. AR 11 C 0306) ही बस समोरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला (क्र. MH 03 CV 3101) ओव्हरटेक करत होती. मात्र, यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने टेम्पोला मागून जोरात धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक अंकित कुशवाह (वय 31) आणि शौर्य पवन सिंग (वय 9) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर मेघा लक्ष्मण पांडे (वय 26, रा. रेवतीपुर, उत्तर प्रदेश), खुशी चंद्रमोहन पांडे, नीलम पवन सिंग (वय 30) आणि पूर्वी पवन सिंग (वय 4) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच समृद्धी कंट्रोल रूमने तातडीने बदनापूर पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक काळे, वसंत राठोड, तसेच कर्मचारी केदारे, जयलाल सुंदरडे आणि MSF चे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ४९ प्रवासी होते. जखमी वगळता उर्वरित ४३ प्रवासी सुरक्षित असून त्यांना पर्यायी वाहनाची व्यवस्था करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

error: Content is protected !!