Homeमहाराष्ट्रमहिलांनी हिंदू कोड बिल आणि संविधानाचे वाचन करावे-रंजना कोळी इंगळे यांचे प्रतिपादन

महिलांनी हिंदू कोड बिल आणि संविधानाचे वाचन करावे-रंजना कोळी इंगळे यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रांजणी येथील मैत्रेय बुद्ध विहारात भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. रात्री ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात गावातीलच सुपुत्री, बेटावद हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका, समाजसेविका, लेखिका व कवयित्री श्रीमती रंजना कोळी इंगळे यांनी प्रथमच महिला व्याख्यानकार म्हणून प्रभावी उपस्थिती नोंदवली. त्यांनी आपल्या ओघवत्या आणि सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा सखोल आढावा घेतला.

विशेष म्हणजे, त्यांनी “हिंदू कोड बिल” या महत्त्वपूर्ण कायद्याबाबत ग्रामीण महिलांना अत्यंत सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. हे बिल काय आहे, ते कोणी तयार केले, त्यासाठी किती संघर्ष करावा लागला आणि डॉ. आंबेडकरांनी ते संसदेत कसे मंजूर करून घेतले, याबाबत त्यांनी प्रभावी मांडणी केली.

यावेळी त्यांनी महिलांना आपल्या हक्कांची जाणीव करून देत संविधान आणि हिंदू कोड बिल वाचण्याचे आवाहन केले. तसेच, ‘भिम जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करूया’ असा प्रेरणादायी संदेश देत गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उभारण्याचा संकल्पही मांडला. वाचनालयासाठी कपाटे देणगी स्वरूपात देण्याची घोषणाही त्यांनी केली.

गावातील या लेकीच्या प्रेरणादायी व्याख्यानाने संपूर्ण महिला वर्ग भारावून गेला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली, ज्यामुळे सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होण्याची चिन्हे दिसून आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!