Homeमहाराष्ट्रजळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्व शासकीय विभागांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात असून, उष्माघाताचा धोका लक्षात घेता दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हात कामे थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये आणि मनरेगा कामांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच शहरातील उद्याने दिवसभर खुली ठेवणे, पाण्याची व्यवस्था, टँकर सेवा आणि सावलीची सोय यावर प्रशासनाचा भर आहे.

उष्णतेची लाट कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या सूचना :
• भरपूर पाणी प्या
• दुपारी १२ ते ४ बाहेर जाणे टाळा
• सैल व हलके कपडे परिधान करा
• अनावश्यक प्रवास टाळा
• लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!