Homeमहाराष्ट्रफळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. आलिया गुलाम महंमद शेख असे या कर्तृत्ववान कन्येचे नाव असून, तिच्या या यशाबद्दल ‘मातंग एकता आंदोलना’च्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

काशीवाडी भागात राहणारे गुलाम अहमद शेख आणि त्यांच्या पत्नी रुकसाना शेख यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गुलाम शेख हे फळे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा हलाखीच्या स्थितीतही त्यांनी अपार कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या एका मुलीने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर दुसरी मुलगी आलिया हिने अनेक अडचणींवर मात करत पोलीस दलात यशस्वीरीत्या प्रवेश मिळवला आहे. आपल्या मुलीच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर अँग्लो-उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि संपूर्ण काशीवाडी परिसराची मान अभिमानाने उंचावली असल्याची कृतज्ञ भावना तिचे वडील गुलाम शेख यांनी व्यक्त केली.

आलियाच्या या प्रेरणादायी यशाची दखल घेत मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश रमेश बागवे यांच्या हस्ते तिचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बागवे यांनी आलियाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “प्रभागातील अनेक तरुण-तरुणींना आलिया खेळाडू, पोलीस भरती आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअरबाबत मोलाचे मार्गदर्शन करते. त्यामुळे परिसरातील प्रत्येक कुटुंबाशी तिचे विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले आहे.”

या सत्कार समारंभाप्रसंगी हुसेन शेख, सुनील बावकर, भारत बाबर, कुमार आडगळे, सुरेश व्यास, सुनील साळवे, नौशाद खान, गवळी ताई यांच्यासह काशीवाडी परिसरातील महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेले हे यश परिसरातील इतर तरुणांसाठी एक मोठा आदर्श ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!