गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील चकलांबा येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. ‘मानव प्रगती बुद्ध विहार चकलांबा येथे सकाळी ध्वजारोहण करून बुद्ध वंदना’ आणि चकलांबा परिसरामध्ये भीमरायांच्या जयघोषाने अवघे गाव दुमदुमून निघाले होते.कार्यक्रमाची सुरुवात मनिष तडवी सतीश घाडगे पाटील यांच्या हस्ते धम्मध्वज रोहणाने झाली.
त्यानंतर तथागत भगवान बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट संदीप रोकडे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत
डी डी रोकडे विष्णू कुलाल अशोक वाव्हाळ शकील शेख प्रकाश खेडकर कुंडलिक गुंजाळ याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय घाडगे माजी पंचायत समिती सदस्य तय्यद भाई शेख चकलांबा येथील पोलीस निरीक्षक सचिन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय पाटील उपस्थित होते.
महिला शक्तीचे प्रतीक म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या महिला , बचत गटाच्या महिला यांनीही महापुरुषांना अभिवादन केले.जयंतीनिमित्त गावातून बँडच्या पथकासह वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीतील मुख्य आकर्षण म्हणजे साकारण्यात आलेला सुंदर आणि देखणा देखावा, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गावातील प्रत्येक चौकाचौकात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घेतला.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसन रोकडे ( मुंबई ), भाऊराव साळवे नाना रोकडे, वसंत साळवे, सुहास रोकडे, अनिल रोकडे यांच्यासह ‘मानव प्रगती बुद्ध विहार’चे सर्व सदस्य आणि ‘मिलिंद मित्र मंडळा’च्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.गावातील प्रत्येक चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उत्सवाचे गांभीर्य आणि गर्दी लक्षात घेता, ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.






















