Homeमहाराष्ट्रआवळगाव येथे 'महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवले जात आहे. याच अभियानांतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी आवळगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकाच शिबिरातून ५२६ लाभार्थ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप करून महसूल प्रशासनाने आपली गतिमानता सिद्ध केली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी हे अभियान मोलाचा ठरेल. नागरिकांना चकरा न मारता एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळाव्यात आणि कोणत्याही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, हाच शासनाचा आणि प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.’

या शिबिराला नायब तहसीलदार लीना बोबाटे, नायब तहसीलदार महानंदा मडावी, दुय्यम निबंधक जयंत मडावी आणि ग्रामसेवक प्रदीप तलमले यांची प्रशासकीय उपस्थिती होती. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जसे की, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, तालुका सरचिटणीस अविनाश म्हस्के, संदीप आष्टेकर, सरपंच प्रितम बाबनवाडे आणि उपसरपंच गुरुदेव वाघरे उपस्थित होते.

शिबिरात जवळपास ६०० ते ७०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. केवळ दाखल्यांचे वाटपच नव्हे, तर नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर चर्चा करून त्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले. महसूल विभागाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आवळगावातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

error: Content is protected !!