शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुके शभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येत आहे. श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मार्फत संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी एस.व्ही.के.एम. संचलित तपनभाई मुके शभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्र, खर्दे बु. ता. शिरपूर जि.धुळे येथे १२०० बेड च्या या अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असून यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री ना.जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व एन.एम.आय.एम.एस.अभिमत विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केले आहे.शिरपूर शहरातील अरुणावती नदी काठावरील शनी मंदिर परिसरात खर्दे बुद्रुक शिवारात या हॉस्पिटलचे काम सुरू आहे.या हॉस्पिटल मार्फत रुग्णांना अतिशय चांगल्या,अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा देण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यात ३५० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे.अनेक प्रकारच्या आजार व रोगांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार असल्याने व देशभरातील नामांकित डॉक्टर्स मार्फत उपचार मिळणार असून जटील शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे दि. २५ एप्रिल २०२६ शनिवार रोजी दुपारी ३ वाजता शिरपूर विमानतळावर आगमन होईल. येथे स्वागत झाल्यानंतर एस.व्ही.के.एम. इंजिनिअरींग कॉलेजचे दुपारी ३.२५ वाजता उद्घाटन व पाहणी, दुपारी ३.४८ वाजता कृष्णा कोटेक्स (वर्ल्ड क्लास) व डाय हाऊस आगमन, उद्घाटन व पाहणी, दुपारी ४.२१ वाजता प्रथ टेक्सटाईल व एसेरोला येथे आगमन व उद्घाटन (एकाच ठिकाणी) व पाहणी, त्यानंतर संध्याकाळी ४.५६ वाजता नर्सिग कॉलेज, खर्दे येथे उदघाटन होईल.यानंतर स्व. तपनभाई पटेल मेमोरीयल हॉस्पीटल (खर्दे) उदघाटन सोहळा संध्याकाळी ५.०८ वाजता होऊन पाहणी करतील.
यानंतर आर.सी.पटेल फॉर्मसी कॉलेज ग्राऊंड, शिरपूर येथे संध्याकाळी ७ वाजता जाहीर कार्यक्रम होईल.या ठिकाणी स्टेजवरून वर्चुअल (सुदूर यंत्रणेद्वारे ग्रीकल्चर कॉलेज व फॉर्मसी कॉलेज तरडी, आर.सी.पटेल इंग्लिश मेडियम स्कूल, निमझरी नाका शिरपूर चे उदघाटन होईल.तसेच स्टेजवरुन वर्चुअल (सुदूर यंत्रणेद्वारे) भूमिपूजन समारंभ होईल.देवमोगरा माता मंदिर, नटवाडे, इंटरनॅशनल मोटर ड्रायव्हींग स्कूल, दहिवद येथील भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर जनकव्हिला, शिरपूर येथे मुक्काम करण्यात येईल.






















