Homeआरोग्यउत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत स्पिरीटसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत स्पिरीटसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :  मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या हाडाखेड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध स्पिरीटची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली आहे. या कारवाईत सात प्लास्टिक ड्रममध्ये भरलेले शुद्ध मद्यार्क (स्पिरीट) आणि वाहनासह एकूण ७ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्रीमती यु.आर. वर्मा आणि धुळे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या आदेशानुसार, हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे पथक गस्तीवर होते. दुय्यम निरीक्षक एम.डी. पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून एका महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ०१ सीआर ४४६९) मधून पळासनेरकडून शिरपूरच्या दिशेने अवैध स्पिरीटची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली.

या माहितीनुसार, पथकाने सांगवी शिवारातील एच.पी.पेट्रोल पंपाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचला. संशयित वाहन थांबवून झडती घेतली असता, त्यात ३५ लिटर क्षमतेचे ७ निळे प्लास्टिक ड्रम आढळून आले. यात एकूण २४५ लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट) भरलेले होते.

या कारवाईत स्पिरीट आणि वाहन जप्त करण्यात आले असले तरी, कारवाईची चाहूल लागताच चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये (६५ अ, ई, ८०, ८१, ८३, ९०, ९८ (२) व १०८) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक एम.डी. पाटील, एस.एस. निकम, जवान गोरख पाटील आणि प्रशांत बोरसे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.डी.पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

खाणीत बुडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मारेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

0
मारेगाव (प्रतिनिधी देवा आत्राम) : नरसाळा येथील पेसा क्षेत्रात बंद पडलेल्या जुन्या दगड खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

error: Content is protected !!