Homeताज्या बातम्याशारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जयभवानी शिक्षण संस्थेचे सचिव तथा शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचा तलवाडा व पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. आसाराम मराठे, माजी सरपंच विष्णू हात्ते आणि अक्रम सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश मरकड, रवी मरकड, नजीर कुरेशी, पत्रकार अल्ताफ कुरेशी, राजाभाऊ डावकर, पत्रकार बापू गाडेकर, माऊली डोंगरे, अंकुश यादव, शारदा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजयसिंह पंडित, प्राचार्य अरुण हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग तसेच विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात आले. रुग्णांची मोफत रक्त तपासणी करून आवश्यक औषधोपचारही मोफत देण्यात आले. शिबिरात मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अजयसिंह पंडित, डॉ. धनश्री पंडित, डॉ. निखिल गव्हाणे, डॉ. प्राजक्ता नरोटे, डॉ. विवेक काळे, डॉ. अंकिता चाळक, डॉ. किरण जाधव, डॉ. मनोज कुमार आदी डॉक्टरांनी सेवा दिली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर समन्वयक भोसले तात्यासाहेब, प्रा. बबन काकडे, नर्सिंग स्टाफ माळवे मॅडम, फार्मसीचे आनंद भगत, राठोड सर, सौरभ पोटे, अमित बागल, श्रद्धा वादे, पुनम पवार, शीतल साळवे, सागर प्रधान तसेच विद्यालयाचे प्राचार्य हाटकर, पर्यवेक्षक लाड सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. पाठक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोबडे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव एल. जे. यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक हाटकर यांनी केले, तर प्रा. पैठणे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी तलवाडा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

error: Content is protected !!