Homeताज्या बातम्याभक्तिमय वातावरणात गेवराईत श्रीमद् भागवत कथेला उत्साहात प्रारंभ

भक्तिमय वातावरणात गेवराईत श्रीमद् भागवत कथेला उत्साहात प्रारंभ

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  समाजात वाढत्या तणाव, असंतोष आणि मानसिक क्लेशाच्या पार्श्वभूमीवर आत्मिक शांती व आध्यात्मिक शक्तीची गरज अधिक जाणवत आहे. अशा वेळी श्रीमद् भागवत कथा ही अंतर्मनाला ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी ठरते, असे प्रतिपादन कथा व्यास सुश्री वैष्णवी भारतीजी यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या, ईश्वर मानायचा नाही, तर जाणायचा आणि अनुभवायचा विषय आहे. प्रत्येकाच्या अंतर्यामीच परमात्मा वास करतो. त्या चैतन्याचा अनुभव घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक आहे. श्रीमद् भागवत कथेमुळे ही दिव्य अनुभूती प्राप्त होते.

दिव्य ज्योति जाग्रती संस्थान, शाखा पाथर्डी यांच्या वतीने बीड रोडवरील दसरा मैदान, गेवराई येथे दि. 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान दररोज सायंकाळी 4.30 ते रात्री 8.30 या वेळेत श्रीमद् भागवत कथाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेमध्ये सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या शिष्या सुश्री वैष्णवी भारतीजी मार्गदर्शन करीत आहेत.

कथेला प्रारंभ होण्यापूर्वी शनिवारी शहरातून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी दसरा मैदानावर कथा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली असून महिला व पुरुष भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

या सात दिवसीय ज्ञानयज्ञात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!