Homeआरोग्यब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी सोमवारी या रुग्णालयावर मोठी कारवाई केली. रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यासोबतच तिथले शस्त्रक्रियागृह (OT) सील करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच या रुग्णांना डोळ्यांत जंतूसंसर्ग झाला. वेदना असह्य झाल्याने आणि दृष्टी अंधुक झाल्याने या रुग्णांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला, मात्र तोपर्यंत त्यांची दृष्टी कायमची गेली होती. रुग्णांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी प्रशासनाकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती.

प्राथमिक तपासणीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949’ चे गंभीर उल्लंघन आढळून आले. स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात होते. तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या नियमांचाही भंग झाल्याचेही दिसून आले. यानंतर
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी या
रुग्णालयाची नोंदणी तत्काळ रद्द करत ऑपरेशन थिएटरसह महत्त्वाचे विभाग सील केले.

एकीकडे सरकार दर्जेदार आरोग्य सेवेचा दावा करत असताना, परवाना नसतानाही खासगी रुग्णालये रुग्णांच्या आयुष्याशी असा जीवघेणा खेळ कसा खेळू शकतात? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ख्रिस्तानंद हॉस्पिटलच्या या कारभारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, अशा ‘खाटिकखान्यांवर’ कायमची बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दृष्टी गेलेल्या रुग्णांचे आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर आणि व्यवस्थापनावर केवळ रुग्णालय सील करून चालणार नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. आता आरोग्य विभाग या प्रकरणात नेमकी काय आणि किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!