Homeताज्या बातम्याक्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवडचा एचएससी निकालात झळाळता यश; ९८% निकालाची परंपरा कायम

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवडचा एचएससी निकालात झळाळता यश; ९८% निकालाची परंपरा कायम

म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एचएससी परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, म्हसवड येथील क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजने यंदाही उज्वल यश संपादन करत आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेमध्ये कुमारी सेजल प्रवीण फडतरे हिने ८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलांतर्गत येणाऱ्या या कॉलेजचा एकूण निकाल तब्बल ९८ टक्के लागला असून, परिसरात सर्वाधिक टक्केवारी मिळवण्याचा मानही संस्थेने मिळवला आहे. द्वितीय क्रमांक ओम दत्तात्रय लांब (७२ टक्के) याने मिळवला, तर तृतीय क्रमांक सौरभ शांताराम घुटुकडे (७० टक्के) याने पटकावला.

विद्यार्थ्यांनी विषयानिहायही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. क्रॉप सायन्स या विषयात २०० पैकी १८९ गुण मिळवत अनुजा दिपक जावीर हिने प्रथम क्रमांक मिळवला. शिवानी दिलीप कापसे (१८७ गुण) हिने द्वितीय, तर आशा सुखदेव खांडेकर (१८१ गुण) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

माहिती व तंत्रज्ञान विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवत मेधा कृष्णराज जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवला. सौरभ शांताराम घुटुकडे आणि नेत्रा मनोज सरतापे यांनी प्रत्येकी ९६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर अविनाश दत्तात्रय कलढोणे (९२ गुण) तृतीय क्रमांकावर राहिला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सौ. सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, संचालक तात्यासाहेब औताडे, प्राध्यापिका शरयू देवकर, सौ. हर्षदा इंद्रजीत बाबर तसेच प्राचार्य विठ्ठल लवटे आणि सर्व शिक्षकवर्ग यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजने केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. म्हसवड पंचक्रोशीत सर्वाधिक निकाल आणि उच्च वैयक्तिक टक्केवारी मिळवत या कॉलेजने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

error: Content is protected !!