Homeआरोग्यआपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

आपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) : 
पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी व्यक्तीचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. क्रिकेट मैदानाजवळील वळणावर चारचाकी आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली होती. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, मात्र जखमीला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले. अशा परिस्थितीत पालघरहून घरी परतत असलेल्या आपदा सखी प्रिया पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपले वाहन थांबवले आणि परिस्थितीचा आढावा घेत मदतकार्य सुरू केले.

त्यांच्यासोबत असलेले आपदा मित्र ओमकार नाईक, आपदा सखी सानिया संखे, सिमरण संखे आणि अपेक्षा संखे यांनीही तत्परतेने सहकार्य करत जखमीस प्रथमोपचार दिले. जखमीच्या तुटलेल्या पायाला आधारफळी लावून त्याला सुरक्षितपणे रिक्षामधून बोईसर येथील टिमा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेतून केंद्र शासनाच्या ‘आपदा मित्र-आपदा सखी’ प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात किती प्रभावी उपयोग होतो, याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दिलेल्या मदतीमुळे जखमीचा जीव वाचवण्यात यश आले.

या धाडसी आणि मानवतावादी कार्याबद्दल संबंधित आपदा सखी आणि आपदा मित्र यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनीही अशा प्रशिक्षणाच्या महत्त्वावर भर देत अधिकाधिक लोकांनी यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

error: Content is protected !!