Homeताज्या बातम्याधुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला आहे. कु. सोनाली बापू पाटोळे असे या धाडसी युवतीचे नाव असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोनालीचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर, आई-वडील कामानिमित्त बाहेर असल्याने तिने गोंदवले येथील गाडगे महाराज आश्रम शाळेत राहून शिक्षण घेतले. पुढे म्हसवडमधील सिद्धनाथ हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण सुरू असताना, तिने पोलीस भरतीची तयारीही जिद्दीने चालू ठेवली.

तिचे वडील बापू पाटोळे हे गवंडी कामगार असून, आई ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत चार मुलांचा सांभाळ करताना कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये एक मुलगा अपघातामुळे अपंग आहे, तर दुसरा शिक्षण घेत आहे.

अशा परिस्थितीतही सोनालीने हार न मानता शिक्षण आणि स्वप्न दोन्ही जपले. विशेष म्हणजे, ज्या समाजात मुलींचे शिक्षण अर्धवट सोडले जाते, तिथे तिने आपली वाट स्वतः घडवली.

निकालाच्या दिवशी आई-वडील मजुरी करत असतानाच तिच्या पोलीस भरतीची बातमी आली आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले. “आमच्या घरात पिढ्यानपिढ्या शिक्षण नव्हते, पण मुलीने तो दुष्काळ संपवला,” असे भावनिक उद्गार तिच्या वडिलांनी काढले.

रामोशी समाजातील सोनालीचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिची ही कामगिरी इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना नाशिकमध्ये दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)  जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची, नियमांची व कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळावी, तसेच महासभेत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत,...

दूध भेसळीची एसआयटी चौकशी करा मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करून संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT)...

८ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

0
पालघर : डहाणू पोलीस ठाणे हद्दीत ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पालघर येथील अपर जिल्हा व सत्र...

error: Content is protected !!