Homeक्राईमनसरापूर घटनेच्या निषेधार्थ जळगावात निवेदन; आरोपींना फाशीची मागणी

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ जळगावात निवेदन; आरोपींना फाशीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हिंदू संघटन, जळगाव यांच्या वतीने दिनांक ४ मे रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकाल द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नसरापूर येथील ही घटना अत्यंत निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. अशा नराधमांना रोखण्यासाठी शासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत. शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून दोषींना १५ ते २१ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ, उपजिल्हाध्यक्ष नागराज महाजन, योगेश बाविस्कर, महासचिव रत्ना अंतर्डे, युवा अध्यक्ष ओम प्रकाश जोशी, उपाध्यक्ष सुनील राजपूत, राजेश बंसल, महिला पदाधिकारी कुमारी मनीषा हटकर, युवा महासचिव निलेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विजय पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर घटनेमुळे राज्यात निर्माण झालेल्या भीती आणि संतापाच्या वातावरणात पीडितेला न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!