Homeमहाराष्ट्रनिफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागले आहेत. तालुकास्तरीय सक्षम समन्वय, प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद आणि चळवळीचा पाठपुरावा यामुळे या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.

दिनांक ४ मे २०२६ रोजी एकाच दिवशी तब्बल सात गावांमधील शेतरस्त्यांची मोजणी पूर्ण करण्यात आली. ही कामगिरी तालुक्यासाठी ऐतिहासिक मानली जात असून, निफाड आदर्श तालुक्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या मोहिमेच्या यशामागे उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरुळे, तहसीलदार विशाल नायकवडे आणि भूमी अधीक्षक राजेंद्र भाबड यांचे महत्त्वपूर्ण नेतृत्व राहिले. तसेच महसूल मंत्री यांच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या यशाबद्दल राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, निफाड चळवळ कृती समितीचे विजय दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार, महसूल व पोलीस प्रशासन, पंचायत समिती आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे तसेच शेतकरी बांधवांचे आभार मानले आहेत.

म्हाळसाकोरे, भेंडाळी, दारणासांगवी, शिंपी टाकळी, डोंगरवाडी, हिंगणवेढे, धारणगाव परिसरातील काही गावे तसेच भुसे, करंजगाव, उंबरखेड आणि पिंपळगाव बसवंत या गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली आहे.

निफाड तालुक्याची ही प्रगती अशीच कायम राहिली, तर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!