दौंड(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड) : दौंड : दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. 298/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अव्दैत विवेक गटणे (वय 37, व्यवसाय खाजगी नोकरी, मूळ रा. महादेव गल्ली, दौंड, सध्या रा. क्विन्स टाउन, चिंचवड रेल्वे स्टेशन समोर, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील विवेक शंकर गटणे (वय 72) यांना आरोपींनी मागील एक वर्षापासून “आमचे काही व्यक्ती फायनान्स कंपनीचे कर्मचारी ओळखीचे आहेत” असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर वेळोवेळी पैसे, सोने व इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र घेतलेल्या वस्तू व रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच पैसे, सोने व मौल्यवान वस्तू परत मागितल्यावर आरोपींनी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे विवेक गटणे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मयताने मृत्यूपूर्वी आरोपींची नावे वहीत लिहून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीसांनी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपेश कदम करीत आहेत. गुन्हा दाखल अंमलदार पोलीस हवालदार सय्यद यांनी नोंदविला आहे.
या प्रकरणातील आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
▪️ संजय भिमराव बारवकर (दौंड)
▪️ अरीफ शमशुद्दीन शेख (दौंड)
▪️ प्रकाश आबाजी भालेराव (दौंड)
▪️ अख्तर अहमद शेख (दौंड)
▪️ आदित्य सुधीर जगताप (पुणे)
▪️ शंकर रमेश वाघमारे (दौंड)
▪️ राजू भीमराव बारवकर
▪️ शितोळे
▪️ सोनवणे
▪️ चोप्रा
▪️ कुलकर्णी (मॅडम)
▪️ शिंदे
▪️ मुल्ला (मुंबई) – पूर्ण नाव माहिती नाही






















