Homeआरोग्यउपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद...

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिरवाडे वाकद (प्रतिनिधी योगेश कर्डिले): जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी व डॉ. बाळू पाटील यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपजिल्हा रुग्णालय निफाड व एसएमबीटी हॉस्पिटल, धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये विविध आजारांवरील तपासणी, सल्ला व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील सहनियंत्रण व सल्लागार समिती सदस्य मधुकर शेलार, सागर कुंदे पाटील, दिलीप आबा कापसे व सुवर्णा लुक्कड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर एसएमबीटी हॉस्पिटलमधील डॉ. यश पाटील (बालरोग तज्ञ), डॉ. अजिंक्य पिंगळे (कान-नाक-घसा तज्ञ), डॉ. साईनाथ शिरोडकर (जनरल सर्जन) व डॉ. मयुर सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ. राजीव तांभाळे यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करत ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच डॉ. यश पाटील यांनी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विविध आरोग्य सुविधा व सेवांची माहिती उपस्थितांना दिली.
अध्यक्षीय भाषणात मधुकर शेलार यांनी एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोठा लाभ होत असल्याचे सांगत नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक नितीन परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपीक दिगंबर चेरापले यांनी केले.
सदर सर्वरोग निदान शिबिरामध्ये एकूण २५७ रुग्णांनी विविध आरोग्य सेवा व उपचारांचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!