Homeताज्या बातम्याक्रीडाकर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप...

कर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप…

कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी खेळाडू कुमारी अश्विनी कृष्णा पावरा हिने आपल्या जिद्द, मेहनत व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मोठे यश संपादन करत धुळे जिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मानाची नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शिरपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कुमारी अश्विनी कृष्णा पावरा ही के. व्ही. टी. आर. सी. बी. एस. ई. स्कूल शिरपूरमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून मागील तीन वर्षांपासून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूर येथे नियमित क्रिकेट सराव करत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत सांगवी ते शिरपूर असा दररोज तब्बल २५-३० किलोमीटरचा प्रवास करून कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिची चिकाटी, शिस्त आणि खेळावरील निष्ठा ही इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी धुळे जिल्हा संघ पुण्याकडे रवाना झाला असून या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अश्विनीवर सोपविण्यात आली आहे. सदर स्पर्धेत धुळे जिल्हा संघाचा सामना छत्रपती संभाजीनगर, सी.एन.ए., सी.डी.ए. तसेच रिक्रिएशनसारख्या पुण्यातील नामांकित क्रिकेट क्लब संघांसोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. कुमारी अश्विनी पावरा हिला संस्थेचे क्रीडा प्रमुख व क्रिकेट प्रशिक्षक प्रा. राकेश बोरसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक ग्रामीण व आदिवासी खेळाडू राज्यस्तरावर आपली छाप पाडत आहेत.कु.अश्विनीच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार रंधे , सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, संजय गुजर, सीमाताई रंधे, प्राचार्य सौ. सुरेखा मिस्त्री, उपप्राचार्य विवेक पाटील, समन्वयक श्री. सागर वाघ तसेच संस्थेचे सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि पालक वर्ग यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कु.अश्विनीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींना क्रिकेट क्षेत्रात मोठी प्रेरणा मिळाली असून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!