Homeमहाराष्ट्रजळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू...

जळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू…

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : सध्या देशातील आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत जिल्ह्यात दिनांक १८ मे २०२६ रोजी रात्री १२:०१ वाजल्यापासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे तसेच व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यासाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून, विनापरवानगी सभा किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ व प्रेतयात्रांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही यामधून वगळण्यात आले आहे.
हे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!