Homeमहाराष्ट्रदौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. अलीकडे दौंड पोलिसांनी काही ठिकाणी धडक कारवाई केली असली, तरी आता नागरिकांकडून मोठ्या होलसेल पुरवठादारांवर आणि साठेबाजांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक पातळीवर गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला आणि अन्य बंदी असलेल्या पदार्थांचा पुरवठा काही मोजक्या होलसेल विक्रेत्यांकडून होत असल्याचे बोलले जात आहे. किरकोळ टपरी चालक हे केवळ विक्रीचे माध्यम असून मुख्य रॅकेट मात्र अद्याप कारवाईपासून दूर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

याशिवाय शहर आणि तालुक्यात इतर काही अवैध धंदेही खुलेआम सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होत असली तरी काही दिवसांनी पुन्हा पूर्ववत विक्री सुरू होत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दौंड पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील गोडाऊन, साठेबाज आणि मोठ्या पुरवठादारांवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आता प्रशासन फक्त किरकोळ विक्रेत्यांपुरती कारवाई मर्यादित ठेवणार की अवैध तंबाखू व्यवसायाच्या मुख्य रॅकेटवर मोठी कारवाई करणार, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

error: Content is protected !!