शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ५ ते १५ जुनपर्यंत कारवाई, उत्पन्न वाढीसाठी धुळे विभागाची विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतूकीमुळे विपरीत परिणाम होत असुन, एस.टी. प्रवाशांना खात्रीशीर व सुरक्षित सेवा पुरवून पुर्ववत आपल्याकडे वळविण्यासह उत्पन्न वाढीसाठी एस.टी. बस स्थानकापासुन २०० मिटर पर्यंत “नो पाकींग झोन” ची प्रभावी अंमजबजावणी करण्यात येत आहे. सदरची मोहीम दिनांक ५ ते १५ जुनपर्यंत राबविण्यात येणार आहे.राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिहवन मंत्री, मा.श्री. प्रताप सरनाईक यांनी विविध आढावा बैठकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूकीमुळे एस.टी. च्या महसुलात घट होत असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानुषंगाने रा.प. महामंडळात नव्याने रुजू झालेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलिस उप महानिरीक्षक, मा.डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागांना विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यांत आले आहेत. या मोहिमे अंतर्गत बसस्थानकाच्या २०० मिटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. धुळे विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी, दिपक धात्रक यांच्या नेतृत्वात व सौ वर्षा रमेश पावरा आगार व्यवस्थापक तसेच स्थानिक वाहतूक शाखेच्या पोलीसांच्या मदतीने आज दि.०९/०६/२०२६ रोजी शिरपुर बसस्थानक परिसरात २०० मिटर “नो पाकींग झोन” ची अंमजबजावणी केली असुन, सदर वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई करतांना जयवंत कोळी व संजय पवार, सहाय्यक सुरक्षा निरीक्षत तसेच शिरपुर आगाराकडुन श्री. मनोज जिजाबराव पाटील सहाय्यक वाहतूक अधिक्षक श्री. सचिन भाईदास पाटील वाहतूक निरीक्षक हे हजर होते.
धुळे विभागातील सर्व बसस्थानकांवर कारवाई सुरु
धुळे विभागातील धुळे मध्यवर्ती बसस्थानकासह देवपुर, साक्री, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा, दोंडाईचा, शिरपुर व शिंदखेडा आगारांच्या अखत्यारीतील सर्व बसस्थानक परिसरात “नो पाकींग झोन” ची अंमजबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
एस.टी. महामंडळाची अवैध प्रवासी वाहतूकीच्या विरोधात धडक मोहिम २०० मिटर नो पार्कंग झोनची कठोर अंमलबजावणी
RELATED ARTICLES
- Advertisment -
गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...
खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...
माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण...
आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास
दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत...
दौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड): बारसा बॉईज फुटबॉल क्लब, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी वार्षिक फुटबॉल स्पर्धा दिनांक ६ व ७ जून रोजी उत्साहपूर्ण...