Homeताज्या बातम्याघरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): एपीआय निलेश मोरे यांच्या तपासकौशल्याने दोन गुन्हे उघड
शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नरडाणा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तीन आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डाबली येथील एका घरफोडीप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे गोरख सुरेश पवार (वय १९), गोकुळ छगन भिल (वय २०), बादल राजू सोनवणे (वय १८, सर्व रा. नरडाणा) तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांनी डाबली, मेलाणे व नरडाणा येथे घरफोड्या तसेच सहा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून १० हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने, बेन्टेक्स पोत, विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन व एक मोटारसायकल असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नरडाणा पोलिस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलिस ठाण्याचे एपीआय निलेश मोरे, पोउनि. रविंद्र महाले, विजय पाटील, रविंद्र शिंदे तसेच पोलिस अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाठ, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गिते, अनारसिंग पवार, धनेश कुंकारी, रविंद्र मोराणीस, विक्रांत देसले, चंद्रकांत साळुंखे, विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनवणे, भरत भगरे, सुनिल पगारे, सुरजकुमार सावळे व होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!